कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याबाबत २२ सप्टेंबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता

कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याबाबत २२ सप्टेंबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता

viart

नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून म्हणजेच कालपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना दोन-तीन दिवसांसाठी स्थगित केल्याचे बोललं जात आहे.

आता बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही मँचेस्टर कसोटीच्या भवितव्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या क्रिकेट प्रतिनिधींना भेटण्यासाठी गांगुली २२ सप्टेंबरला यूके गाठणार आहे. मँचेस्टर कसोटीच्या संभाव्य आयोजनाची चर्चा करण्यासाठी गांगुली यूकेला जाणार असल्याची माहहती समोर आली आहे. हा कसोटी सामना न खेळवता आल्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे गांगुली अधिकृत प्रसारकांशी भेटून परिस्थितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, बीसीसीआयच्या मते, ही मालिका अजून संपलेली नाही आणि भारत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेचा शेवटचा सामना नंतर दोन्ही मंडळांच्या परस्पर संमतीने नवीन तारखेला खेळला जाईल. दुसरीकडे, इंग्लंड क्रिकेटचे विधान आहे की खेळला जाणारा सामना हा एकमेव कसोटी असेल आणि त्याचा मालिकेशी काहीही संबंध नाही.

महत्त्वाच्या बातम्या