शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार; भाजपच्या लाक्षणिक उपोषणात ‘ठाकरे’ सरकारला इशारा!

bjp

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यासह मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अतिवृष्टीमुळे हातातील पीक नाहीशी झाली आहेत. त्यात कुंभकर्णाची झोप घेतलेल्या उदासीन राज्य सरकारमुळे बळीराजा हतबल झाला आहे. हीच बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर ४ ऑक्टोबर पासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आहे.

या उपोषणाचा मंगळवारी नववा दिवस होता. यावेळी बोलतांना माजी आमदार सांडू पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवणार आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, शहर अध्यक्ष कमलेश कटारीया यांनी यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी, ई पीक पाहणीची अट रद्द करावी, पीक विमा मंजूर करण्यात यावा या मागण्या ठेवलेल्या आहेत.

यासोबतच वीज कनेक्शन खंडीत करणे थांबवावे व तोडलेले वीज कनेक्शन त्वरित जोडावेत, शेतकऱ्यांचे सर्व पीक कर्ज त्वरित माफ करण्यात यावे व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम द्यावी, विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करा इत्यादी मागण्या मांडल्या. शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांनी आवाहन करतांना शहरातील पदाधिकऱ्यांना आवाहन केले की अडचणीच्या काळात समाजातील सर्वच घटकांनी शेतकरी राजाच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. या उपोषणाच्या नवव्या दिवशीच्या नेतृत्वात भाजपा नेते कैलास जंजाळ,  उपजिल्हाध्यक्ष विलास पाटील, वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या