ईशानच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर वडिलांनी दिली प्रतिक्रिया

ishan kishan

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताने इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. यात इशान किशनचा १८ जुलै रोजी वाढदिवस होता. २३वा वाढदिवशी इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिलाच सामना गाजवला. या सामन्यात इशान किशनने ४२ चेंडुत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. किशनने पहिल्याच चेंडुवर षटकार आणि दुसऱ्या चेंडुवर चौकार मारत आपल्या वाढदिवसाचे फटाके स्वत:च फोडायला सुरुवात केली. अवघ्या ३३ धावांत इशान किशनने अर्धशतकाला गवसणी घातली.

इशाच्या या उत्कृष्ट खेळीमुळे त्याचे वडील प्रणव पांडे आणि त्याचं कुटुंब आनंदित झाला आहे. यावर ईशानचे वडील प्रणव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुलाखत देताना ईशानचे वडील प्रणव  यांनी सांगितले की, “ज्याप्रकारे ईशानने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली तशीच त्याने श्रीलंका विरुद्धही केली. यावेळी त्याला यष्टीरक्षण करण्याची संधी मिळाली जिकी त्याच्या कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ईशानने कोरोना काळात या सामन्यापूर्वी खूप मेहनत घेतली हे त्याचेच फळ आहे. तसेच ते पुढे म्हणाले, या सामन्यात त्याच्याकडून काही चुका झाल्या मात्र त्या चुका सुधारत वर्षाच्या अखेरीस युएईमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी त्याला फलंदाजीसह यष्टिरक्षणावर अजून मेहनत घ्यावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP