क्रिकेट जगत शोकसागरात, कोरोनामुळे ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या वडीलांचे निधन

blank

नवी दिल्ली : देशासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यातच आता दिल्लीतील माजी क्रिकेटपटू संजय दोबाल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे.

… म्हणून कृषीमंत्री थेट त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

संजय दोबाल हे दिल्लीच्या क्लब क्रिकेटसाठी खेळले होते तसेच ते दिल्लीतील एका प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखले जायचे. डोबाल यांच्या मृत्युवर दिल्ली क्रिकेट असोशिएशनने शोक व्यक्त केला आहे.

डोबाल यांना काही दिवसांपूर्वी कावीळ झाली होती. त्यानंर त्यांची चाचणी केली तर ते कोरोना पॉझिटिव्ह आले. रविवारच्या दिवशी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने सोशल मीडियावर त्यांना मदत करण्याचे अवाहन केले होते. दिल्लीच्या या माजी अष्टपैलू खेळाडूंचे निधन झाल्याने क्रिकेट जगतात मोठा धक्का बसला आहे.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू, दोन्ही बाजूचे पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह

डोबाल यांच्या परिवारात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. सिद्धांत राजस्थानच्या संघाकडून खेळतो तर छोटा मुलगा एकांश दिल्लीच्या 23 वर्षाखालील संघाकडून क्रिकेट खेळतो.गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोबाल यांच्या म़त्यूवर सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग, माजी बीसीसीआय अध्यक्ष सीके खन्ना, माजी क्रिकेटपटू मदनलाल, मनहासो यांनी शोक व्यक्त केला आहे.