महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ लोकप्रिय महिला आमदाराच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू

bjp flage

पुणे – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. मागील 2 दिवसांपासून 800 च्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तब्बल 4 हजारांच्या वर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत. मात्र, तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे वडील वसंतराव लिमये (वय 85) यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मुक्ता टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, ते सर्वजण 14 दिवस ‘होम कोरोंटाईन’ राहणार आहेत.

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे वसंतराव लिमये ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. वसंतराव लिमये हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनात 50 वर्षांपासून कार्यरत होते. ते भारतीय नौदलाच्या विक्रांत या लढाऊ नौकेवर काही काळ कार्यरत होते. टेल्को या नामांकित कंपनीतही त्यांनी कार्य केले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘गरिब कल्याण अन्न योजना’ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार, पंतप्रधानांची मोठी घोषणा

शहरात कोरोनाचे १७ रुग्ण झाल्या नंतर औरंगाबाद्करांचे डोळे अखेर उघडले

देशाला नडणाऱ्या चिन्यांना ‘ठाकरे सरकार’चा जबर दणका