ओवेसी यांच्या कार्यक्रमाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणाऱ्या मुलीचे वडील म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. बंगळुरुमधील सीएएविरोधी मंचावरुन अमुल्याचे लोयोनाचे या तरुणीने माईकवरुन ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ओवेसी आणि संयोजकांना प्रचंड धक्का बसला होता.

या ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देणाऱ्या अमुल्या लियोना या तरुणीला अटक करण्यात आली असून तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. अमुल्याला अटक केल्यानंतर तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...

अमुल्याचे लोयोनाचे वडिल म्हणाले की, अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र अमुल्याने माझं काही ऐकलं नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या मुलीला तुरुंगात पडून राहू द्या. पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका असं म्हणत तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

‘हिंदुस्थान झिंदाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद यात फरक आहे’ असं अमुल्या माईकवर बोलत होती. मात्र तिथल्या आयोजकांनी तिच्याकडून माईक हिसकायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. हा संपूर्ण प्रकार पाहून ओवेसी स्तब्ध झाले आणि त्यांनी त्वरित त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘आमचा या तरुणीशी काही संबंध नाही भारत झिंदाबाद होता आणि झिंदाबाद राहील’ असं ओवेसी यांनी म्हटलं होतं.आता पुढे त्या तरुणीवर काय कार्यवाही केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....