fbpx

कर्जमाफी न मिळण्याच्या धास्तीने शेतक-याची आत्महत्या

The farmer's suicide

बीड : आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही असा समज करून बीड जिल्हयातील पाटोडा येथील एका तरूण शेतक-याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रसेन गायकवाड (35 )असे त्याचे नाव असून दोन दिवसांपुर्वी त्याला मुलगा झाला म्हणून त्याने आनंदाने पेढे वाटले होते. डोक्यावर असलेले बँकेचे कर्ज व खाजगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच चंद्रसेन असायचा. शासनाच्या कर्जमाफीच्या अटीत आपण बसू शकणार नाही असे त्याला वाटल्याने त्याने आत्महत्या केली.