कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर

shetkari

टीम महाराष्ट्र देशा : एकीकडे पेट्रोल आणि डीझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, डॉलरच्या तुलनेत रुपया झोपला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अन्नदाता हतबल झाला आहे. राज्यातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. रक्ताचं पाणी करून नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील प्रगतशील शेतकरी अरविंद सोनवणे यांनी कोबीचे पिक घेतले पण भाव मिळाला अवघे २ रुपये. मग हतबल अन्नदाता काय करणार ? शेवटी काळजावर दगड ठेवून आणि सरकारच्या नावाने मिऱ्या वाटत शेतकरी अरविंद सोनवणे यांनी साडेसात एकरात उभ्या कोबीच्या पिकात नांगर फिरवला.

अरविंद सोनवणे यांची सटाणा शहरालगत शेती आहे. त्यांनी साडेसात एकरात कोबीची लागवड केली. बऱ्यापैकी पाणी मिळाल्याने कोबीची 1 लाख 65 हजार रुपयाची रोपं विकत घेतली. खतं, औषधं, फवारणी, मजुरी असा सर्व मिळून जवळपास दोन लाख 85 हजार रुपये खर्च आला. नीटनेटके व्यवस्थापन करुन दर्जेदार उत्पादन घेतले. माल काढणीला आला आणि पहिल्याच तोड्यात 100 किलो माल त्यांनी बाजारत विक्रीला पाठविला. पण त्याला अवघा 2 ते 3 रुपये किलो असा भाव मिळाला. ज्या गाडीतून माल भरुन पाठविला त्या गाडीच्या भाड्याचे पैसेही वसूल झाले नाहीत. उलट त्यात खिशातून पैसे भरावे लागले.

Loading...

या सर्व परिस्थितीमुळे वैतागलेल्या अरविंद सोनवणे यांनी संपूर्ण साडेसात एकरावर ट्रॅक्टरने रोटोवेटर फिरवत, कोबीचं पीक उद्ध्वस्त केले. आधी कांद्याला भाव नाही, मागणी घटल्याने कांदा आज सात ते आठ रुपये किलोने विकला जात आहे. त्यात भर पडली ती टोमॅटोची. टोमॅटोला 1 ते 2 रुपये किलोचा भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांनी हा टोमॅटो रस्त्यावर किंवा गुरांना खाऊ घातला.

त्यानंतर आता कोबीलाही तुटपुंजा असा 2 ते 3 रुपयांचा दर मिळत आहे. तर शिमला मिरची 10 रुपये किलोने विकावी लागत आहे. सगळ्याच भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश