बहुचर्चित ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : सुबोध भावेचा बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज झाला. अभिनेता, निर्माता आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या सुबोध भावेने ‘पुष्पक विमान’ या सिनेमात पार पाडल्या. ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर सुबोध भावे पुन्हा एकदा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘पुष्पक विमान’बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा सिनेमा आजोबा आणि नातवाची गोष्ट आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभंगगीतांचे नवे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. 3 ऑगस्टला पुष्पक विमान प्रदर्शित होणार आहे.

सिनेमात आजोबांच्या भूमिकेत अभिनेते मोहन जोशी दिसणार आहे.तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत आहे. आजोबा पहिल्यांदाच शहरात येतात आणि इथलं जग पाहून थक्क होतात. त्यांनी विमानही पहिल्यांदाच पाहिलं असतं. आणि त्या विमानात त्यांना बसायचं असतं. त्यासाठी त्यांच्या नातवाचा आटापिटा सुरू होतो.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आलिया-रणवीरच्या नात्यावर सिद्धार्थचा खुलासा

 

 

Shivjal