करमाळा बाजार समितीसाठी तिरंगी लढत….

evm

करमाळा– बहुचर्चित करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी अखेर तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेतकरी मतदार संघातून १५ जागांसाठी ४४ अर्ज शिल्लक राहिलेले आहेत. १५ गणातून ही निवडणूक होत असून १२ गणात तिरंगी, दोन गणात दुरंगी ,तर एका गणात चौरंगी  लढत होत आहे.

पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात ही निवडणूक होत असून प्रथमच शेतकऱ्यांना ह्या निवडणूकीत मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. एकूण १८ जागा असलेले करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत याअगोदर दोन जागा व्यापारी मतदार संघातून तर १ जागा हमाल/तोलार मतदारसंघातून बिनविरोध झालेली आहे. १५ जागा ह्या शेतकरी मतदारसंघातील असून १२ गणात तिरंगी, दोन गणात दुरंगी ,तर एका गणात चौरंगी  लढत होत आहे

शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप हे युती करून निवडणूक लढवित आहेत तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल तसेच जि प अध्यक्ष संजय शिंदे हे स्वबळावर लढणार असून या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे थोड्याच दिवसांत समजेल.