काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी

औरंगाबाद: गंगापूर येथील आंदोलन दरम्यान मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे या युवकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तसेच शिंदे यांच्या भावाला शासकीय नौकरी देण्यात येणार आहे. याबद्दलचे लेखी आश्वासन औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी गंगापूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरु केल होते. तसेच मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी !