विजयदुर्ग किल्ल्याची पडझड; खासदार संभाजीराजेंनी पुन्हा गाठली दिल्ली

khasdar Sambhaji raje

विजयदुर्ग: ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात. अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली असता ना.पटेल यांनी तातडीने  केंद्रीय पुरातत्व खात्याला दुरूस्ती खर्च तयार करण्याचे दिले आदेश दिले आहेत.

समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली.  किल्लय़ामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार बुधवारी सकाळी आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली. पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Breaking News: पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये, प्रशासनाचे नवे आदेश

तर, आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याविषयी तत्परता दाखवत थेट दिल्ली गाठली होती. त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे या ऐतिहासिक महत्व असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीच्या पडझडीनंतर लगेच डागडुजी करण्यात यावी यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह यांची काल भेट घेतली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनीही ठेवले मोदींच्या पावलावर पाऊल;चीनला दिला तगडा झटका

याविषयी त्यांनी फेसबुकद्वारे लिहिलेली पोस्ट-

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली. यावेळी दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिले. बैठकीमध्ये  स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

काश्मीर मधील बदलांमुळे गैरसमाजाचे धुके नष्ट होईल-प्रा. विनय चाटी

श्री पटेल यांनी तातडीने  केंद्रीय पुरातत्व खात्याला एस्टीमेट तयार करण्याचे आदेश दिले. पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत त्या  सर्व  कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत अशी सूचना सुद्धा त्यांनी केल्या. आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करीत तात्काळ निर्णय घेतले.