सरकारचे रोजगार निर्मितीतील अपयश बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले

 

टीम महाराष्ट्र देशा : आज ( २० मार्च ) सकाळपासून अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवून जोरदार निदर्शने केले. गेल्या साडेतीन तासांपासून सुरू असलेलं अखेर विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.

मात्र, आता या आंदोलनावरून विरोधीपक्षाने सरकारला चांगलाच धारेवर धरलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रेल्वेभरती परीक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत, याची गंधवार्ताही सरकारला असू नये हे Intelligence Failure आहेच. तसेच गेल्या 3 वर्षांत सातत्यपूर्णरीत्या रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे. अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...