fbpx

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं – धनंजय मुंडे

0Dhananjay_Munde_0

मुंबई – फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचे असल्याची टीका आमदार धनंजय मुंडे यांनी केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या धुळ्या दौऱ्यावरुन लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. या विरोधात सरकारच्या हुकुमशाहीचा निषेध मुंडे यांनी नोंदवला आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस सरकारवर जाहीर टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर @Dev_Fadnavis सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध,  असे मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये ,म्हंटले आहे.

मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील (विखरण ता.शिंदखेडा) यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी सहा वाजेपासूनच विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. दरम्यान या प्रकरणी धर्मा पाटील याचा मुलगा नरेंद्र याने 24 डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही.

तरी ही नरेंद्र आणि त्याच्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले. आता स्वत: मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत आपण येथून घरी जाणार नाही, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली होती. दरम्यान, आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळेस मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा ही प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

2 Comments

Click here to post a comment