फडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा घोटी येथे पार पडली. फडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे. नाशिकमधील अनेक विकासकामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच माझी आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सुरक्षा कमी करण्यात आली. यापूर्वी याच सरकारने माझ्या जीवाला धोका असल्याचे कोर्टात म्हटले होते, सरकारचे नक्की काय चालले आहे याचा काही नेम नाही, असे आ. जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन कागदपत्रावरच राहिले. भाजप सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगून थट्टा करत आहेत. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रचंड विकास झाला होता. आता मात्र शेतकऱ्यांवर रडण्याची पाळी आली आहे. शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना पूर्वीसारखे उभे केले पाहिजे. यासाठी आगामी २०१९ निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता नको, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. मधुकर पिचड यांनी मांडले

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभेदरम्यान दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने घोटीमध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. एअरपोर्ट बांधले मात्र सरकारने या चार वर्षांत ते सुरू केले नाही, अशी खंत माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.