विमानसेवा सुरू झाली तरच निर्यात केंद्राला चालना मिळेल – सुभाष देशमुख

Subhash Deshmukh

सोलापूर : आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्राचा दर्जा मिळणे सोलापूरसाठी अभिमानस्पद बाब आहे. यामुळे उत्पादन आणि रोजगार निर्मितीला वाव मिळणार आहे. मात्र यासाठी तातडीने सोलापुरात विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. विमानसेवा सुरू झाली तरच निर्यात केंद्राला चालना मिळेल अन्यथा घरापर्यंत आलेली संधी हातून जाणार आहे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.

विकासनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डीजीएफटीने देशात फक्त पाच ठिकाणी निर्यात हब केंद्राला मान्यता दिली आहे. यात सोलापूरचा समावेश असणे गौरावस्पद आहे. यामुळे अनेक देश-विदेशातील लोक सोलापुरात येतील. त्यासाठी विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. विमानसेवेअभावी निर्यात केंद्राला चालना मिळणे अशक्य आहे, असेही आ. देशमुख म्हणाले. सोलापुरातील कोरोनाच्या स्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोरोनाच्यापूर्वी सिव्हीलमधील २५ टक्के पद रिक्त होती. अशा परिस्थिती कोरोना आजार आला. त्यात बहुतांश खासगी दवाखानेही बंद आहेत. त्यामुळे सिव्हील प्रशासनावर ताण पडत आहे. सिव्हीलवरचा ताण कमी करणे आवश्यक आहे. महापालिकाही आरोग्य यंत्रणा हाताळण्यात कमी पडल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात महापालिकेचे ३२ दवाखाने आहेत. त्यातून सेवा दिली जात नाही. त्याबद्दल आपण आयुक्तांशी चर्चा करू आणि ते दवाखाने सुरू करण्यास सांगू, असेही आ.देशमुख म्हणाले.

सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ? अवधूत वाघांचा खोचक सवाल

दरम्यान, सोलापूर शहरात कोरानाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी अडीच महिन्यात ८० टक्के लोकांना कोराना होईल, असे सांगणे म्हणजे चुकीचे आहे. त्यामुळे सोलापूरकर भयभीत होणार आहेत, असेही  सुभाष देशमुख म्हणाले.

मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, मात्र डिझास्टर कंट्रोलरूमची अद्याप जुळवाजुळवच सुरू- शेलार