निसर्गाचे शोषण करून केलेला विकास शाश्वत नाही – अण्णा हजारे

अण्णा हजारे

अहमदनगर: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून येथे सुरू झालेल्या पर्यावरण संमेलनाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पर्यावरण या विषयामुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे. प्रकृतीचे शोषण आपण थांबवायला हवे. निसर्गाचे शोषण करून केलेला विकास शाश्वत नाही. विकासाला सूज आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक संमेलनाध्यक्ष पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले.राळेगणसिद्धी येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनास सुरूवात झाली. अण्णा हजारे म्हणाले, येत्या ८०-९० वर्षात समुद्रकाठच्या शहरांना धोके निर्माण होणार आहेत. राळेगणला ग्रामस्थांनी अडीच-तीन लाख झाड़े लावून जगवली आहेत. त्यामुळे गावात डॉक्टरांना फार पेशंट मिळत नाहीत.पर्यावरण कार्यकर्त्यांना त्यांनी ध्येयवादी बनण्याचा सल्लाही त्यांनी दिला.