सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात; सरन्यायाधीश मिश्रा यांना पत्र

kuriyan josef

टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात असल्याचं धक्कादायक पत्र न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना लिहिले आहे. कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्तीला उशीर होत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात असल्याचे पत्र जोसेफ यांनी सरन्यायाधीश मिश्रा यांना लिहिले आहे.

न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात ‘कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे,’ असे म्हटले आहे. तसेच त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीत होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

‘कॉलेजियमच्या शिफारसीला तीन महिने होऊन गेलेत. मात्र अद्याप न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे,’ असे पत्रात लिहित वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ राजी व्यक्त केली आहे.