मागास जातींचे अस्तित्व धोक्यात ; प्रकाश आंबेडकर

मागास जातीसमूह विकासापासून वंचित

मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला फटकारले. मागास जातींचे अस्तित्व धोक्यात असून सध्याच्या सरकारची ओबीसी गणणेचा अहवाल प्रसिद्ध करण्याची  हिंमत नाही, असे ते म्हणाले.

कोरेगाव भीमा दंगलीनंतर राजकारणाला वेगळी वाट निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर वार्तालापात कोरेगाव भीमा प्रकरणावर बोलतांना म्हणाले, दंगल घडावी असे अनेकांचे प्रयत्न होते. मात्र दंगल घडली नाही. समाजात राजकीय परिपक्वता आल्याचे हे द्योतक आहे, असे मी मानतो. हिंसाचारानंतरच्या महाराष्ट्र बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या बंदमध्ये सर्वाधिक सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांना बदनाम करणे सोपे असते.

आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेवर सुद्धा भाष्य केले.  जाती व्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या अर्थव्यवस्थेने अनेक मागास जातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक मागास जातीसमूह विकासापासून वंचित राहिले आहेत. हे वास्तव उजेडात येईल म्हणून ओबीसी गणणेचा अहवाल प्रसिद्ध करण्याची सरकारची हिंमत होत नाही. असे बोलून त्यांनी सरकारला ठणकावले.

You might also like
Comments
Loading...