परिक्षा विभागाचा सावळागोंधळ, पैठण येथील परीक्षा केंद्रच केले रद्द

Dr-Babasaheb-Ambedkar-Marathwada-University

पैठण/प्रतिनिधी (किरण काळे पाटील)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत सिनियर कॉलेज बीए, बीकॉम, बीएससी शाखेच्या सेमिस्टर परिक्षा नोव्हेंबर २०१७च्या परिक्षेचा पैठण येथील एक परिक्षा केंद्र परिक्षेच्या पुर्व संध्याला ऐनवेळी रद्द केल्याने परिक्षार्थी व पालकांचा गोंधळ उडाला विशेष करून याचा प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास महाविद्यालयीन तरुणींना झाला असुन परीक्षा केंद्र गाठण्यासाठी धावपळ करीत असतांना दिसल्या.

सीनियर कॉलेज कला व वाणिज्य शाखेच्या सेमिस्टर परीक्षा प्रारंभ झाली असुन सदरील परिक्षा करिता पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालय, मँजिक कॉम्प्युटर, ताराई महाविद्यालय अन्नपर्णानगर पैठण असे तीन केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र  विद्यापीठ परिक्षा विभागाने परीक्षार्थींना कोणतीही पर्व सुचना न देता  शहराच्या यशवंत नगर येथील मँजिक कॉम्पुटर परिक्षा केंद्र अचानक रद्द केल्याने एकुण ४५०विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्र बदलून प्रतिष्ठान महाविद्यालय करण्यात आले.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात गोंधळ उडाला. तसेच अचानक पणे केंद्र रद्द झाल्याची माहिती परिक्षार्थीं ना केंद्रावर पहोचल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा एकच गोंधळ उडाला.त्यामुळे रद्द झालेल्या परिक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना वेळेवर दिलेल्या केंद्रावर पहोचता आले नाही परिक्षाची वेळ १०वाजताची असतांना प्रतिष्ठान महाविद्यालयात रोल नंबर व खोली क्रमांक पहण्यासाठी परीक्षार्थाना महविद्यालयाच्या आवारात आकरा वाजल्याने परीक्षार्थीं हवालदिल दिसले तसेच ऐनवेळी प्रतिष्ठान महविद्यालयात बैठक व्यवस्था करण्यात आल्याने एका खोली मध्ये दिडशे ते दोनशे विद्यार्थी कोंबुन बसविण्यात आले व एका टेबलावर तीन तीन विद्यार्थी बसविण्यात आल्याने विशेष करून महविद्यालयीन विद्यार्थ्यांनींची कुचंबणा निर्माण झाली. दरम्यान या सर्व प्रकरास विद्यापीठ परिक्षा विभागाचे प्रमुख डॉ नेटके हे जबाबदार असुन परिक्षा केंद्र रद्द केल्या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी विद्यार्थी व पालकांनी विद्यापीठाकडे केली आहे.

परिक्षा केंद्र रद्द करण्याचा गौडबंगाल

परिक्षेच्या पुर्व संध्येला मँजिक कॉम्प्युटर परीक्षा केंद्र रद्द करण्यामागे वेगळेच गुपीत असल्याचे चर्चा पालक वर्गात सुरू होती याबाबत माहिती घेतली असता रद्द केलेल्या परिक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारची बैठक व्यवस्था नाही तसेच सदर मँजिक कॉमप्युटर हे कागदोपत्री असल्याचा विद्यार्थी व पालकांनी आरोप केला आहे. मात्र विद्यापीठ परिक्षा विभागाच्या तुघलगी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता बाळावली आहे