नीट परीक्षा ४ महिने पुढे ढकलली, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी घेणार मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मदत

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्थरीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यानुसार नीटची परीक्षा चार महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या मेडिकलच्या विद्यार्थांची मदत घेतली जाणार आहे. यात ज्या कोव्हीड योद्धाने ड्युटीचे १०० दिवस पूर्ण केले, अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

देशातील ऑक्सिजन आणि मेडिसिन उपलब्धतेबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्या दृष्ट्रीकोणातून संसाधन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. या बैठकीत नर्सिग कोर्स करत असलेले विद्यार्थी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

कोरोना काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी १०० दिवस पूर्ण केल्यास त्यांना ‘कोव्हीड राष्ट्रीय सेवा पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा देखील या वेळी करण्यात आली. या शिवाय ज्या नर्सिंग विद्यार्थ्यांची अंतीम वर्षांची परीक्षा झालेली नाही, असे विद्यार्थी वरीष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा करु शकतील. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना केंद्राच्या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या