सदाबहार रेखा होती ‘या’ क्रिकेटपटुच्या प्रेमात

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेट ही लव्हस्टोरी भारतीयांसाठी नविन नाही. अनेक क्रिकेटपटुंचे बॉलीवूडमधील अभिनेत्रीशी नाव जोडले गेले आहे. काही क्रिकेटपटु आणि अभिनेत्री यांनी लग्नही केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा पण एक अभिनेत्री आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार बॉलीवूड आणि क्रिकेटमधील ३६ वर्ष जुने प्रेमप्रकरणाचा खुलासा झाला आहे.

बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रेखा ही पाकिस्तनचे सध्याचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या प्रेमात होती. इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर एका युझरने जुन्या वृत्तपत्रातील बातमी त्याच्या अकांउटवर शेअर केली आहे. ही बातमी १९८५ मधील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या या नात्याला रेखाच्या आईचा होकार होता. त्याकाळात दोघांना मुंबईत काही ठिकाणी एकत्र बघीतल्याचा दावाही करण्यात आला होता. या काळात ते खुप जवळ आले होते. मात्र इम्राम यांनी अभिनेत्री सोबत काही काळ राहणे शक्य आहे. मात्र लग्नाला त्यांचा नकार होता.

मात्र नंतर कुठे माशी शिंकली माहित नाही. दोघे वेगळे झाले. यानंतर इम्रान खानने ३ तर रेखाने १ लग्न केले. रेखाने १९९० मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले तर इम्रान खान यांनी प्रथम १९९५ मध्ये ब्रिटीश निर्माती जेमिमा गोल्डस्मिथ, २०१४ मध्ये पत्रकार रेहम खान आणि २०१८ मध्ये बुशरा यांच्याशी लग्न केलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP