शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही

टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर आधीच कर्जाचा बोजा असताना राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली. अशातच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी यांनी एक भाकीत वर्तवल आहे. राज्यासाठी लवकरच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. यासाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.

ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही’, असं भाकित पाटील यांनी वर्तवलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेड आणि नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिलं होतं. आता त्यांना सत्तेत बसण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. शेतकरी संघटना १२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करावं लागेल, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...