मनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला सिनेमा ‘३१ दिवस’

 टीम महाराष्ट्र देशा : ‘३१ दिवस’… का?, कशासाठी?, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित ‘३१ दिवस’ सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मोठ्या पडद्यावर कधीही न पाहिलेली भव्यता पाहणं प्रेक्षक नेहमीच पसंत करतात. तोच ग्रँजर आणि बॉलिवूड टच प्रेक्षकांना मनापासून आवडेल असा ‘३१ दिवस’ हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. सिनेमाची उत्कंठा वाढवणाऱ्या या ट्रेलरमध्ये अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल हे अनोखं त्रिकुट प्रेक्षकांना पाहायला मिळणार. अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कारकीर्द सुरु करून आता मराठीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. प्रेक्षकांना कुठेही गृहीत न धरता अप्रतिम निर्मिती मूल्य असलेल्या सिनेमाची निर्मिती बी.एस. बाबू यांनी केली आहे. ‘३१ दिवस’ सिनेमात अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून राजू खेर, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या सिनेमाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडित असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याचबरोबर पदार्पणात पहिला सिनेमा करताना तो एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल देखील असावा अशी धारणा दिग्दर्शक आशिष भेलकर यांची आहे. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून सिनेमाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नृत्य दिग्दर्शक वृषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केलं आहे. सिनेमातील १२ मिनिटांचा स्टंट क्लायमॅक्स त्यांनी दिग्दर्शित केला आहे.

या सिनेमाचा नायक मकरंद हा कलाक्षेत्रात नाव कमवू पाहणारा होतकरू आणि उमदा तरुण आहे. लहान मुलांना नाटक शिकवण्याच्या संधी पासून ते थेट एका मोठ्या बॅनरचा सिनेमा दिग्दर्शित करण्यापर्यंतचा प्रवास करत असताना मकरंदच्या स्वप्नांचा डोलारा असा काही कोसळतो की नव्याने काही सुरुवात होईल ही शक्यताच दाट काळोखात विरून जाते. मात्र त्याच्या आयुष्यातील मुग्धा (मयुरी देशमुख) आणि मीरा (रीना अग्रवाल) त्याच्या आधार बनतात. मनाने तरुण असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा आणि त्याची गाणी उत्तम पर्वणी ठरणार आहे. या सिनेमाचं संगीत चिनार-महेश या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. गायक हर्षवर्धन वावरे, हृषिकेश रानडे, कीर्ती किल्लेदार आणि वैशाली माडे यांनी सिनेमातील गाणी गायली असून गीतकार मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केली आहेत.

सिनेमातील कथा गाण्यासोबत नयनरम्य आणि मनाला स्पर्शून जाणारे लोकेशन्स चित्रपटातील मुख्य आकर्षण आहेत. बाहुबली सिनेमात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच या सिनेमातील ‘मनं का असे’… हे गाणं चित्रित झालं आहे. येत्या २० जुलै २०१८ रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यापूर्वी मराठीत कधीही न पाहिलेले लोकेशन्स आणि सेट मनोरंजनची उत्तम मेजवानी असलेल्या ‘३१ दिवस’ या सिनेमात असल्याने तो पाहण्यासाठी एक दिवस काढावा अशी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा होईल.

मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच

‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर