अभियंत्याला एक कोटीचा गंडा, आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

cyber crime

औरंंगाबाद : शेअर मार्केटच्या बाजारपेठेशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर अभियंत्याला एक कोटी २० लाख रुपयांना गंडा घालणाNया चौघांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळला.

ईश्रत ईलाही खान (वय ६५), नावेद ईलाही खान (वय ४५), डॉ. आसना रबाब (वय ३६) आणि नुसरत ईलाही खान फैजल ईलाही खान (वय ७२, सर्व रा. सेंट्रल नाका, जसवंत पुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

जिन्सी पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर अभियंता असलेले ४३ वर्षीय मोहम्मद अजहर रहिमुद्दिन करैशी यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, आरोपींनी संगणमत करून के. मल्टिसव्Nिहसेस फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटिंग, जमीन खरेदी विक्रीचा व जमीन विकसित करण्याच्या व्यवसायात ८ ते ११ टक्के प्रतिमहिना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी २८ लाखांची फिर्यादीची व इतरांची पेâब्रुवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत एक कोटी २० लाखांची आर्थिक फसवणूक केली. प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी काम पाहिले.

महत्वाच्या बातम्या