शत्रूला देखील मराठा सैनिकांची भीती वाटते : लष्करप्रमुख

Bipin Rawat

टीम महाराष्ट्र देशा- मराठा लाईट इन्फट्रीचा इतिहास मोठा असून शिवाजी महाराजांच्या विचारांनी आमची इन्फट्री प्रेरित आहे. जिथे मराठा सैनिक तैनात असतो, तेथील शत्रूदेखील या सैनिकांना घाबरतो, असे सांगत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मराठा इन्फट्रीतील जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

मराठा लाईट इन्फट्रीचा इतिहास मोठा असून या इन्फट्रीला २५० वर्ष पूर्ण झाली. रणभूमीवर इतिहासात असे एकही युद्ध नाही, जे ११४ मराठा रेजिमेंटला मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. जिथं मराठा सैनिक तैनात असतो, तेथील शत्रूला देखील या मराठा सैनिकांची घबराट वाटते, असे त्यांनी सांगितले.