करमाळ्यात सकल मराठा समाजाने काढली सरकारची अंत्ययात्रा

शंभुराजे फरतडे/ करमाळा : मराठा आरक्षणासाठी वारंवार आंदोलने-मोर्चे होऊनही सरकार याची दखल घेतली जात नाही व सुनावणीही होत नाही नुसतीच  पोकळ आश्वासने दिली जातात. तसेच आरक्षणासाठी सरकारने घेतलेले ४जणांचे बळी या निषेधार्थ करमाळा येथील पोथरे नाका ते तहसिल कार्यालयापर्यंत सकरकारची अंतयात्रा काढण्यात आली तिरडी मोर्चा नावाने हे अनोखे अंदोलन करुन शासनाचा निषेध करण्यात आला. या अंदोलनास जवळपास दहा बारा हजारांचा जनसमुदय लोटला होता. या वेळी सरकारची प्रतिकातत्मक तिरडी बांधण्यात आली होती तिरडीवर झोपवलेल्या कापडी पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मुखवटा बसवला होता.

आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय रहात नाही.
एकच मिशन मराठा आरक्षण,एक मराठा लाख मराठा या घोषणांचे फलक हातात घेवून शाळकरी मुला-मुलींनी मोर्चाचं नेतृत्व केलं. मोर्चा जेव्हा भवानी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ आला तेव्हा ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी शहर दणाणून गेल. मराठा आरक्षणाच्या मागणी साठी गेल्या दहा दिवसापासुन करमाळा तहसील कचेरीवर ठिय्या अंदोलन सुरु होते, मात्र राज्यभर झालेल्या ठिय्या अंदोलनाने सरकार जागे झाले नाही उलट चार मराठा युवंकाचा बळी गेल्यांने मराठा समाजाच्या संतापाचा भडका उडाला होता. त्यामुळे फक्त सोशल मिडीयावरील मोर्चाच्या आवाहनावरून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.

करमाळा येथील पोथरे नाका येथुन सुरु झालेला मोर्चा जय महाराष्ट्र चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, संगम चौक, असा मार्गक्रमण करत तहसील कचेरीवर पोहचला त्यानंतर मोर्चा चे जाहिर सभेत रुपांतर झाले.यावेळी गौरी नारायण डौले राजेश्वरी सदाशिव जगदाळे, श्वेता उबाळे या मुलींनी आपल्या भाषणातुन सरकारचे वाभाडे काढले. दरम्यान ज्ञानेश्वरी चिवटे, साक्षी मोरे, आदिती कदम,साक्षी साळुंखे, प्रिती जाधव, जिया बलदोटा,सदिच्छा शेळके या मुलींनी तहसीलदार संजय पवार. यांना मोर्चा चे निवेदन दिले.

तहसीलच्या आवारातच प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यविधी मोर्चा दरम्यान केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला अग्नीदहन करण्यात आले. या वेळी मराठा समाजाच्या दोन युवकांनी स्वता:चे मुंडण करुण घेतले.

ठिय्या अंदोलन स्थगित

आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजाचे युवक गेल्या दाहा दिवसापासुन तहसीलदार संजय पवार यांच्या गेट समोर ठिय्या अंदोलनास बसले होते आजच्या मोर्चा नंतर ठिय्या अंदोलन स्थगित करण्यात आले.

शनिशिंगणापूर देवस्थान राज्य सरकारच्या ताब्यात ; रात्री उशिरा विधानसभेत विधेयक मंजूर

मराठा आंदोलन : पाटस येथे पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्ग अडवला

You might also like
Comments
Loading...