Share

Viral Video | खड्ड्यात अडकलेल्या हत्तीला काढले बाहेर, बाहेर येताच हत्तीने मानले आभार! पाहा व्हिडिओ

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोशल मीडियावर आपल्याला अनेक वायरल व्हिडिओ बघायला मिळतात. त्यामध्ये मुख्यतः पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ जास्त बघायला मिळतात. बराच वेळा जंगली प्राणी मानव वस्तीमध्ये घुसल्याचे व्हिडिओ देखील आपल्याला दिसतात. जंगली प्राण्यांमध्ये हत्तीचे अनेक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. रस्त्यावरून चालताना किंवा मानव वस्तीमध्ये अन्नाच्या शोधात घुसलेल्या हत्तीचे व्हिडिओ आपण बघत असतो. असाच एक हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

युट्युबवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती एका खोल खड्ड्यात पडल्याचे दिसून येत आहे. तो स्वतःहून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करताना सुद्धा दिसत आहे. हा अस्वस्थ झालेला हत्ती आपल्या कळपापासून वेगळा होऊन खड्ड्यात पडल्यामुळे हरवलेला असावा.

ही घटना कुर्गमध्ये घडलेली आहे. हत्ती अडकल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळताच हत्तीला बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावले गेले. त्याचबरोबर वनविभागातील अधिकारी तेथे लगेच उपस्थित झाले. जेसीबी आणि वन विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने हत्तीला सुखरूपपणे खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. माती निसरडी असल्यामुळे हत्तीला बाहेर काढणे थोडे कठीण होते पण त्या हत्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ

https://youtu.be/GbKcci0wJvg

हत्तीने मानले आभार

व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे हत्ती जेसीबीच्या मदतीने काही सेकंदातच खड्ड्यातून बाहेर पडू शकला. खड्ड्यातील निसरड्या मातीत खूप वेळ राहून हत्ती खूप थकला होता. खड्ड्यातून बाहेर आल्यावर हत्ती चालायला लागला. चालत असताना हत्तीने जेसीबी कडे वळून त्याचे आभार मानून जंगलाकडे धाव घेतली.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोशल मीडियावर आपल्याला अनेक वायरल व्हिडिओ बघायला मिळतात. त्यामध्ये मुख्यतः पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ जास्त बघायला मिळतात. …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now