fbpx

महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली

aurangabad-mahapalika

औरंगाबाद: महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतीपदासाठी आज निवड झाली. सभापती निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान घेण्यात आले. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काम पहिले.

नवीन सभापती निवडण्यासाठी सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काल सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग क्रमांक-१ टाऊन हॉल येथे आशा निकाळजे, खान नसरीन बेगम आणि परवीन कैसर खान यांनी अर्ज दाखल केले होते. यांच्यामधून श्रीमती आशा विजय निकाळजे यांची सभापती म्हणून निवड झाली.

प्रभाग-२ मोंढा येथे बबिता चावरिया आणि रेशमा कुरेशी या दोघांनी अर्ज भरले होते तर येथे श्रीमती बबिता विजय चावरिया यांची सभापती म्हणून निवड झाली.तसेच प्रभाग-३ सेंट्रल नाका येथे सय्यद सरवत बेगम आणि पठाण अस्मा फिरदोस यांच्या मधून पठाण अस्मा फिरदोस यांची सभापती म्हणून निवड झाली. प्रभाग-५ सिडको येथे सुरेखा खरात आणि भारती सोनवणे या दोघींच्या लढती सुरेखा गौतम खरात यांनी बाजी मारली तर प्रभाग-६ सिडको येथे मनोज गांगवे आणि सोहेल शेख यांच्यामधून मनोज बन्सीलाल गांगवे यांची सभापती म्हणून निवड झाली.

प्रभाग-८ सातारामध्ये अप्पासाहेब हिवाळे आणि सायली जमादार यांचे अर्ज दाखल झाले होते यांच्यामध्ये अप्पासाहेब विनायक हिवाळे यांनी बाजी मारली. तसेच प्रभाग क्रमांक-४ हर्सूलच्या सभापतीपदासाठी बन्सी जाधव, प्रभाग-७ मालखरे अपार्टमेंट येथील सभापती पदासाठी रमेश जायभाये आणि प्रभाग क्रमांक-९ क्रांतीचौक येथील सभापती पदासाठी सुमित्रा हळनोर यांचा एक एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे यांची बिनविरोध निवड झाली.