अफगाणिस्तानातील शिक्षण व्यवस्था शरिया कायद्यानुसारच असणार; तालिबानचा पुनरुच्चार

अफगाण

काबुल – अफगाणिस्तानातील उच्च शिक्षण मंत्रालय आणि उच्च शिक्षण संस्थांद्वारे, अफगाणिस्तानातील विद्यापीठं एका आठवड्यात पुन्हा सुरु होण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं वृत्त अफगाण प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. याबाबतचा निर्णय या आठवड्यापूर्वी घेतला जाईल तसंच अभ्यासक्रमात होणारे बदलांबाबतही चर्चा सुरु असल्याचं अफगानिस्तानचे कार्यवाह उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी काल सांगितलं आहे.

गरजेचे नसलेले विषय बदलून आधुनिक विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश करण्यात येईल जेणेकरुन अफगाणी विद्यार्थी इतर जगाच्या स्पर्धेत उतरू शकतील. तसंच महिला आणि पुरुषांसाठी वेगळ्या वर्गांची बैठक व्यवस्था करण्यात येईल. शिक्षण व्यवस्था शरिया कायद्यानुसार असेल असा पुनरुच्चार हक्कानी यांनी केला. मात्र मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं हे पाऊल असल्याबद्दल सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर आता तेथे महिलांवर बंधने घालण्यात येत असून मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असणार आहे. इस्लामी पेहरावही त्यांना सक्तीचा करण्यात आला आहे. अफगाण देशातील प्रमुख विद्यापीठांना स्त्रोतांच्या कमतरतेमुळे वेगवेगळे वर्ग पुरवणं परवडत नसल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या :