ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ काँग्रेस नेत्याला बजावला समन्स

ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ काँग्रेस नेत्याला बजावला समन्स

congress /Ed

अमरावती : गेल्या कही दिवसांपासून राज्यासह देशभरात ईडीच्या कारवाईचा धडाका पाहायला मिळत आहे. राज्यातील सेना-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीने समन्स पाठवले असताना दुसऱ्या बाजूला आता काँग्रेसच्या नेत्याला देखील आता ईडीने समन्स बजावले आहे. तसंच तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावला आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवत असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागवला होता. अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले.

ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देणे बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता ईडीने बॅंकेचे माजी अध्यक्ष बबलु देशमुख व उत्तरा जगताप यांना समन्स बजावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या