अवघड जागी चेंडु लागल्यावर पृथ्वीने केली ‘ही’ कृती; व्हिडीओ व्हायरल

आहमदाबाद : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने पंजाब किंग्सचा ७ गडी राखुन पराभव केला आहे. पंजाबने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य ३ गडी गमावत अवघ्या १८व्या षटकात पार केले. ९९ धावांची खेळी करणारा पंजाबचा कर्णधार मंयक अग्रवाल हा सामनावीराचा मानकरी ठरला.

या सामन्यातील दुसऱ्या डावात पंजाबने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन खेळत होते. पंजाबकडून ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रायली मेरिडिथ गोलंदाजी करत होता. या षटकातील एक चेंडु पृथ्वी शॉच्या अवघड जागी लागला. यावेळी पृथ्वीला प्रचंड वेदना जाणवत होत्या. यानंतर पृथ्वीने खाली बसला आणि त्याने भर मैदानात पॅन्टमध्ये डोकावून पाहिले. ही कृती करतेवेळी तो स्वत:ही हसत होता.

या सामन्यात नंतर पृथ्वी शॉने चांगली फलंदाजी करत २२ चेंडुत ३ चौकार आणि ३ षटकारासह ३९ धावा केल्या. पृथ्वीला पंजाबच्या हरप्रित ब्रारने त्याला त्रिफळाचीत केले. पंजाबने दिलेल्या १६७ धावांचे लक्ष्य ३ गडी गमावत आठराव्या षटकात पार केले. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने ४७ चेंडुत ६ चौकार आणि २ षटकारासह सर्वाधिक ६९ धावांची नाबाद खेळी केली.

महत्वाच्या बातम्या