नरेंद्र आणि देवेंद्रची जोडी गेली ५ वर्ष राज्यात सुपरहिट ठरली

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले आहेत. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र असा फॉर्म्युला आपल्याला कायम ठेवायचा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात पुन्हा भाजप महायुतीचेचं सरकार आणूया, असे आवाहन केले आहे. ते आज नवी मुंबई येथे बोलत होते.

यावेळी मोदी म्हणाले की, दिल्लीत ज्या प्रमाणे नरेंद्रला पुन्हा संधी दिली त्याप्रमाणे महाराष्ट्रातही देवेंद्र यांना पुन्हा संधी द्या. कारण ही नरेंद्र आणि देवेंद्रची जोडी गेली ५ वर्ष राज्यात आणि देशात सुपरहिट ठरली आहे. महाराष्ट्र राज्य गेली ५ वर्ष विकासाच्या पायऱ्या चढत आहे. तसेच कमल 370ला विरोध करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा कलम 370 कडे लक्ष वेधले. देशहिताच्या मुद्द्यावर तरी किमान सगळ्याच राजकीय पक्षांची मतं एक असली पाहिजे, असे मोदी म्हणाले. नवी मुंबईतून लवकरचं विमान उड्डाण घेणार आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेले विमानतळ काही दिवसातचं पूर्ण करणार आहे, असे मोदी म्हणाले.

दरम्यान आज मोदींची आकोला येथेही भव्य सभा झाली. यावेळी मोदींनी विरोधकांचा चांगलाचं समाचार घेतला. लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रातील जनतेने विरोधकाना संदेश दिलाय, मात्र विरोधकांना कळत नाही. तीनवेळा मराठवाड्यातून मुख्यमंत्री झाले होते. मात्र अजूनही मराठवाड्याला पायाभूत सुविधा मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षा शेवटचा श्वास घेत असून राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं वाजले असून दोन्ही पक्ष फक्त 20 जागा जिंकणार असल्याचा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या