दारूच्या नशेत एका रात्रीत केली तब्बल तीन देशांची सफर

Beer man hand in lockdown

टीम महाराष्ट्र देशा : दारूच्या नशेत कोण काय काय करेल याचा काही भरवसा नाही. असाच अघटीत प्रकार नॉर्वेत घडला आहे. दारूच्या नशेत एका व्यक्तीने तब्बल तीन देशांची भ्रमंती केली आहे.

काय आहे सविस्तर प्रकरण

नॉर्वेमध्ये राहणारा हा व्यक्ती डेनमार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशन करत होता. पार्टी करताना त्याने दारु प्यायली आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी कॅब बूक केली. मला तीन देश फिरव अशी सूचना त्या व्यक्तीने चालकाला दिली. विशेष म्हणजे त्याचं घर घटनास्थळापासून ६०० किलोमीटर दूर नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये आहे. या प्रवासा दरम्यान त्याने तीन देशांची सैरही केली. ज्यामध्ये डेनमार्क, स्विडन आणि नॉर्वेचा समावेश आहे.

यानंतर घरी पोहोचल्यावर त्याने टॅक्सीचं बिल पाहीलं तर त्यालाही धक्काच बसला. कारण, टॅक्सीचं बिल २२०० डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ३९ हजार रुपये झालं होतं. त्याने हे बिल भरण्यास नकार दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा व्यक्ती आपल्या घरी पोहोचला त्यावेळी तो घरात गेला आणि झोपला. त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर नशेत असलेल्या या व्यक्तीने १८०० नॉर्वेजियन क्रोनचं बिल भरण्यास तयारी दाखवली.