‘रेमेडिसविर’ औषध कोरोनावर गुणकारी नाही ; WHO ने केले औषधांच्या यादीतून बाद 

कोरोना वॅक्सीन

मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक हे आज कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आता देशात आणि जगात या महामारीवर लस शोधली जात आहे. यासाठी अनेक तज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत आपल्या प्रयत्नांची शर्त लढवत आहेत.

दरम्यान, देशभरात थैमान घातलेल्या कोरोना संदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. रुग्णाला कोरोनामुक्त करण्यासाठी अनेक देशात ‘रेमेडिसिविर’ हे औषध वापरल जात होते. मात्र आता हे औषध औषधांच्या यादीतून (WHO) आरोग्य संस्थेने बाद ठरवलं आहे.

रुग्णाला करोनाची बाधा झाल्यानंतर अनेक रुग्णांना बरे करण्यासाठी ‘रेमेडिसवि’र हे औषध देण्यात येत होते. मात्र हे औषध कोरोना मात करण्यासाठी गुणकारी ठरत आहे. यासंबंधीचा कोणताही पुरावा नसल्याने आता WHO ने औषधांच्या यादीतून हे औषध बाद केले आहे. रॉयटर्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

दरम्यान आता ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य संघटनेने आदेश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP