महाआघाडीच्या ड्रायव्हरकडे लर्निंग लायसन्स देखील नाही – नक्वी

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेस पक्षाच्या तीन मुख्यमंत्र्यांचा शपथ विधी सोहळा काल पार पडला. शपथविधी समारंभाला जाताना राहुल गांधी यांनी राजस्थानहून मध्यप्रदेशकडे जाताना एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. या फोटोत विरोधी पक्षातले सगळे नेते बसमधून प्रवास करताना दिसत आहे.

बसमध्ये राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे बाजूबाजूला बसलेले आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते शरद यादव, द्रमुकचे स्टालिन, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुला आदी नेतेही बसमध्ये बसलेले दिसत आहेत.

या फोटोबाबत भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले आहे की, महाआघाडीच्या वाहनात ड्रायव्हरच्या जागेवर बसलेल्या व्यक्तीकडे साधे लर्निंगचे लायसन्ससुद्धा नाही.” विरोधी पक्षाच्या या एकत्रित फोटोने भाजपच्या वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.