धक्कादायक! पेशंटवर उपचारासाठी डॉक्टरने बोलावला मांत्रिक

पुणे: मांत्रिक बोलावून जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात समोर आला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका सीरियस पेशंटवर उपचार करण्यासाठी डॉक्टरने मांत्रिक बोलावून जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संध्या गणेश सोनावणे असं या दुर्दैवी महिलेचं नाव असून दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मांत्रिक बोलावल्याची माहिती मिळत आहे. हा मांत्रिक रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलावला की रुग्णालयाने, हा चौकशीचा भाग आहे. पूर्ण माहिती घेतल्यावर यावर बोलू असं ते म्हणाले आहेत.

पहा व्हिडीओ…