कापुस खरेदीत आघाडीवर राहणाऱ्या जिल्ह्याने कर्ज वाटपातही अग्रेसर व्हावे – सुनील केदार 

sunil kedar

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसोबत कृषी क्षेत्रातही मजबूती आणण्याची गरज आहे. जिल्हयातील एकही शेतकरी खरीप पिक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी बँकांनी अपात्र केलेल्या पिककर्ज प्रकरणाची नोडल अधिकाऱ्यांनी तपासणी करावी अशा सुचना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुनील केदार यांनी केलेल्या आहेत.

सुनील केदार यांनी आज तहसील स्तरावरील बँक शाखेला भेटी दिल्या. पीक कर्ज प्रकरणांचा बॅक शाखेनिहाय आढावा घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबबात तक्रारी ऐकून घेतल्या. जिल्ह्यातील सेलू येथे त्यांनी जनप्रतिनिधींची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

वर्धा जिल्हयातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदीत राज्यातून बाजी मारली आहे. पिकर्ज वाटपातही हा जिल्हा प्रथम राहावा व शेतकरी सुखी व्हावा अशी इच्छा सुनील केदार यांची आहे. बॅकांनी अपात्र ठरविलेल्या पिककर्ज प्रकरणाची यादी बँकाकडून प्राप्त करुन घ्यावी. तालुकास्तरावर तहसिल, सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणुन तपासावी. पीक कर्जामुळेच शेतकऱ्यांना आधार मिळतो. प्रत्येक शेतकऱ्याने पिक विमा काढण्यासाठी बँकांनी प्रोत्साहित करावे अशा सूचना केदार यांनी बॅकांना दिलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –