लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना म्हणावे लागले, ‘…तो मी नव्हे’

लातूर : सोशल मीडियाच्या युगात अफवांचे पेव फुटले असे म्हटले जाते. या अफवांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबतही घडलाय. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक अधिकारी लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी व्यापारी आणि दुकानदारांना मारहाण करताना दिसतोय. हा व्हिडीओ लातूरचा असून लातूरचे जिल्हाधिकारी नागरिकांना मारत असल्याची अफवा लातूर मधील सोशल मीडियावर व्हायरल होतेय..

या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना सोशल मीडियावर हा व्हिडीओ लातूर जिल्ह्यातील नव्हे तर मध्य प्रदेश मधील असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. इतकेच नाही तर अशी अफवा पसरवल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लातूरसह राज्यात ब्रेक द चेनच्या नावाखाली बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापारी आधीच प्रशासनावर चिडलेले आहेत. अशा परिस्थितीत या व्हिडीओमुळे आणखी संतापाची लाट पसरण्याची भीती होती. त्यामुळे अखेर लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही म्हणावे लागले… तो मी नव्हेच.

महत्त्वाच्या बातम्या :