शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

हिंगोली : शिवसेना-काँग्रेस नेत्यांमधील संघर्ष काही मिटता मिटत नाहीये. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे हिंगोलीत तणाव निर्माण झाला आहे. टारफे यांनी बांगर यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच बांगर यांच्या अटकेसाठी टारफे यांनी हिंगोलीत आंदोलन केले. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. तर दुसरीकडे, खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत सेनेकडून औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.­­

टारफे आणि बांगर यांची आंदोलने, मोर्चा आणि बंदमुळे हिंगोलीतील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे हिंगोलीत कडक पोलीस बंदोबस्ट ठेवण्यात आला आहे. हा विषय इथेच संपला नसून काँग्रेसच्या वतीने आज हिंगोली शहरात संतोष बांगर यांना अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्ह्यातील महत्वाची दोन शहरे औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे गुन्ह्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे आता जिल्ह्यात तणाव वाढला असून सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Rohan Deshmukh

संभाजी ब्रिगेडच्या शरद पोखरकरांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

Latur Advt
You might also like
Comments
Loading...