युतीची चर्चा गेली खड्ड्यात : उद्धव ठाकरे

udhav thakare

बीड : सध्या सर्वत्र भाजप-शिवसेना या दोन्ही पक्ष्यांची युती होणार की नाही याची चर्चा जोरात चालू आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलेच तापलेले पाहवयास मिळाले. युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारव टीका केली.

उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून बीडमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच सध्या युतीची कोणतीही चर्चा सध्या सुरु नसल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार की नाही यावर प्र्श्नचिन्ह उभा राहिले आहे.

आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक काही कामाचे नाही, नुसतेच गाजर दाखविण्याचे काम आहे अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

राम मंदिराचा निर्णय जर न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.