राज्याचा विकास बंद करून ठाकरे, पवार व गांधी परिवाराचा विकास चालू आहे; गावडेंची घणाघाती टीका

राज्याचा विकास बंद करून ठाकरे, पवार व गांधी परिवाराचा विकास चालू आहे; गावडेंची घणाघाती टीका

राज्याचा विकास बंद करून ठाकरे, पवार व गांधी परिवाराचा विकास चालू आहे; गावडेंची घणाघाती टीका

पुणे – लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तुलनेनं ग्रामीण भागात जास्त प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत.

या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले आहेत. मात्र भाजपाने या बंदला विरोध केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं होतं. दरम्यान, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर आणि पवार कुटुंबीयांवर शरसंधान केले आहे.

ते म्हणाले, जेव्हा पासून हे तीन चोरांचे सरकार महाराष्ट्रात आले आहे तेव्हा पासून एक प्रकारे महाराष्ट्र बंदच आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बंद, विमा बंद, बलात्काऱ्यांवर कारवाई बंद, विकासाचे प्रकल्प बंद. राज्याचा विकास बंद करून ठाकरे, पवार व गांधी परिवाराचा विकास चालू आहे अशी टीका गावडे यांनी केली आहे.

दरम्यान, आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या रक्त आणि घामाने उभे केलेले सहकारी दूध संघ, साखर कारखाने, सूत गिरण्या कवडीमोल भावाने स्वतःच्या नातेवाईकांच्या घशात घालून वर शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांची दुकानं बंद करायची..! कसं जमतं हे पवार साहेबांना ? असा सवाल देखी त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या