बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; दुसऱ्या दिवशीही दहा बळी

बीड: मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या त्याचबरोबर मृतांची संख्या ही वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दहा जणांचा बळी घेतला. ५८० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर २९२ कोरोनामुक्त झाले. दरम्यान, बीड व अंबाजोगाईतील रुग्णवाढीचा वेग कायम आहे. नव्या रुग्णवाढीसह मृत्यूसत्राने बीडकरांची धाकधूक वाढली आहे.

मंगळवारी जिल्ह्यातील ३ हजार ५२९ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यात २ हजार ९४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ११४, आष्टी ७१, बीड १४६ , धारुर १५, गेवराई ३६, केज ५०, माजलगाव ३९, परळी ६०, पाटोदा १८, शिरुर २१ आणि वडवणी तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. तसेच २९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा इतका झाला असून २९ हजार ७१ इतका झाला असून २५ हजार ७३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ६८२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार यांनी ही माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या