शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही तर जनतेची इच्छा : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 15 दिवस उलटले आहेत, विद्यमान विधानसभेची मुदत आज संपणार आहे, मात्र तरी राज्यात सरकार स्थापनेबाबत काही निर्णय होण्याची शक्यता, अजूनही दृष्टीपथात नाही. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र सरकार स्थापनेचा दावा केला नाही.

राज्यामध्ये निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाच्या परिस्थितीमध्ये भाजपचा मित्रपक्ष आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं, याचा सल्ला घेतल्याचं आठवले म्हणाले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला ‘राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेनेला सरकार स्थापनेचा कौल दिला आहे. त्याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. त्यांनीच समंजसपणा दाखवायला हवा,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.

दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याचं दाखवून दिलं. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या