भारतातील मुसलमान रामाचे वंशज; ओवेसीसारखे लोक देशाला तोडू इच्छितात- गिरिराज सिंह

नवी दिल्ली: भारतातील कोणताही मुसलमान बाबरचा वंशज नाही व कोणताही मुसलमान विदेशी नाही. भारतातील मुसलमान हे रामाचे वंशज आहेत, आमचे पूर्वज एकच असून फक्त पूजा पद्धती वेगळी असू शकते, असे दावा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादात अडकत असतात. एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योध्येतील वादग्रस्त जागेवरच बाबरी मशीद उभारली जाईल, असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देतांना गिरिराज सिंह म्हणाले, ओवेसीसारखे लोक ज्यांच्या ह्दयात जिन्नांच्या भूताने प्रवेश केला असून ते देशाला तोडू इच्छितात, ते उद्या मक्का मदिनाला जातील. आम्ही कुठं जायचं ? काय पाकिस्तानमध्ये राममंदिर बांधायचे का, असा सवाल करत त्यांनी ओवेसींवर निशाणा साधला. ओवेसींना देश तोडायचा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.