शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्या उपमहापौर छिंदमला अखेर अटक

The Deputy Mayor Chhindam is finally arrested

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणे उपमहापौर छिंदम यांना महागात पडले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. छिंदम यांनी महापालिका कामगाराला फोनवर बोलताना शिवजयंती आणि शिवाजी महाराज यांना उद्देशून अपशब्द वापरले होते. दरम्यान हा संभाषणाचा ऑडियो व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त करण्यात येत होता.

Loading...

The Deputy Mayor Chhindam is finally arrested

भाजपने केले निलंबित खुर्ची ही गमवावी लागली
श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो  व्हायरल होताच नगर शहरात याचे पडसाद उमटत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच छिंदम यांची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

श्रीपाद छिंदम यांचे कार्यालय फोडले
उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त जमावाने श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली.

काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

The Deputy Mayor Chhindam is finally arrestedLoading…


Loading…

Loading...