वंचित बहुजन आघाडीला एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी चालतात : कवाडे

औरंगाबाद- ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीला एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी चालतात, पण रिपब्लिकन चळवळ चालत नाही. म्हणून त्यांनी वंचित आघाडीपासून आम्हाला वंचित ठेवले असा घणाघात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता लगावला. ते औरंगाबादेत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले प्रा. जोगेंद्र कवाडे?

कॉंग्रेस सोबत आघाडीची आमची बोलणी सुरू आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने कॉंग्रेसकडे सहा जागांचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी चार जागा विदर्भ तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी एका जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत.वंचित आघाडीने आम्हाला वंचित ठेवले. त्यांना एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी चालतात पण कवाडे, आठवले, खोब्रागडेसह रिपब्लिकन पक्ष मात्र चालत नाही.