खोब्रागडे कुटुंबियांच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात- अशोक चव्हाण

The demands should be urgently approved by the government

मुंबई- धानसंशोधक कृषीभूषण स्व. दादाजी खोब्रागडे यांनी गरिब परिस्थितीवर मात करून आपल्या दीड एकर जमिनीवर एमएमटीसह तांदळाच्या नऊ जातींची निर्मिती केली. आज देशात लाखो हेक्टरवर एचएमटी तांदळाचे उत्पादन घेतले जाते. लाखो शेतक-यांच्या घरी या वाणामुळे आर्थिक समृध्दी आली मात्र दादाजी खोब्रागडे आर्थिक विवंचनेतच राहिले.

बुधवारी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे जाऊन धानसंशोधक कृषीभूषण स्व. दादाजी खोब्रागडे यांना श्रध्दांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीदरम्यान खोब्रागडे कुटुंबियांनी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. सरकारने खोब्रागडे कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांनी मुंबई येथे पत्रकारपरिषदेत केली.

Loading...

खोब्रागडे कुटुंबियांच्या मागण्या –

1. HMT, DRK यासह दादाजी खोब्रागडे यांनी संशोधीत केलेल्या धानाच्या सर्व वाणाचे पेटंट खोब्रागडे कुटुंबीयांना मिळावे.

2. नांदेड येथे दादाजी खोब्रागडे यांच्या नावाने भात संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी 100 एकर जमीन खोब्रागडे यांच्या संस्थेला द्यावी.

3. धानाच्या संशोधीत वाणाचे बियाणे सुरक्षित साठवून ठेवण्यासाठी गोडाऊनची आवश्यकता आहे, त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.

4. देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी मंजूर केलेल्या इंदिरा सागर (गोसी खुर्द) प्रकल्पाचे काम तात्काळ पूर्ण करून नांदेड परिसरातील शेतक-यांना त्याचे पाणी द्यावे. जेणेकरून या भागातील शेतकरी वर्षातून दोनवेळा भाताचे पीक घेवू शकतील. स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तीच खरी श्रध्दांजली ठरेल.

5. खोब्रागडे कुटुंबातील दोघांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी द्यावी.

6. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणा-या संशोधक व शेतक-यांसाठी दादाजी रामजी खोब्रागडे यांच्या नावाने कृषी पुरस्कार द्यावा.

खोब्रागडे कुटुंबियांच्या या मागण्या संदर्भात आपण सरकारला पत्र लिहिणार आहोत आणि सरकारने या मागण्या मान्य कराव्यात यासाठी पाठपुरावा करणार आहोत असे खा. चव्हाण म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले