मुंबई – केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही त्यांची भूल आहे… शेतकरी कधीही थकणार नाही… त्यामुळे वेळ गेलेला नाही. चर्चा करा… कायदे रद्द करा… असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
देशात तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा सुरुवातीपासून आहे. परंतु भारत बंदला आवाहन केले आहे मात्र याबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. याबाबत पक्षातंर्गत चर्चा करुन त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय होईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबाबतची भूमिका शेतकऱ्यांची आहे त्याला सुरुवातीपासून पाठिंबा राहिलेला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत ही भूमिका पक्षाची आहे.नवीन कायदा करण्याचा अधिकार सरकारला असतो. लोकांना विश्वासात घेऊन कायदा केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता पण आम्ही एक पाऊल मागे घेणार नाही ही मोदीसरकारची भूमिका राहिली आहे त्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी ‘या’ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- सरकार स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानकडून ‘या’ देशांना देण्यात आले आमंत्रण
- अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास चौकशी