मंत्रिपदाची मागणी दादापर्यंत पोहचवते – सुप्रिया सुळे

supriya sule

औरंगाबाद : पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांची मंत्रिपदाची मागणी रास्त आहे. ती आपण पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि पक्ष प्रमुख शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पदवीधर मतदार संघ किंवा शिक्षक मतदार संघ या दोन्ही मतदारसंघातील मतदार हे शिकलेले आणि विचार करून मत देणारे आहेत. असे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत नाही असा आपला गैरसमज आहे. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी हा गैरसमज दूर केला असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

शिक्षण मंत्रिपदाची अडचण
आमदार चव्हाण यांनी विक्रम काळे किंवा मला शिक्षण मंत्री पद द्या अशी मागणी भाषणात केली होती. याविषयी बोलताना शिक्षण मंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसून काँग्रेस पक्षाकडे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही अशक्य नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या